भुसावळात अयोध्येतील श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रण पत्रिकेचे विमोचन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका जिल्ह्यात वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला निमंत्रण पत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

अनेक वर्षांपासून रामभक्त वाट पाहात असलेला क्षण आता काही दिवसांवर आलेला आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकांचे वाटप सुरू आहे. त्याचप्रकारे वरणगाव येथील वासुदेव नेत्रालाय द्वारे देखील येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना तपासणी सोबत अयोध्या येथील निमंत्रण पत्रिकांचे वाटप सुरु झाल आहे.

वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ.सौ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील हे नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रसेर असतात. रुग्ण तपासणी झाल्यावर डॉक्टर औषधीं उपचार पत्रिका देतात त्याची दुसरी बाजू हि कोरी असते. डॉ.नितु पाटील यांनी त्या कोऱ्या बाजूवर श्री रामजन्मभूमी तीर्थाषेत्र यांनी जगभरातील रामभक्तांना जे निवेदन केले आहे ते छापले आहे.

२२ जानेवारी २०२४ या शुभ दिनी सर्वांनी आपल्या गावात,परिसरात,भजन कीर्तन करावे आणि आनंदोत्सव साजरा करावा. तसेच संध्याकाळी घरोघरी दीपोत्सव साजरा करावा असा मजकूर छापला असून वासुदेव नेत्रालय आता ते प्रत्येक रुग्णांना वाटप करत असून जनजागृती करत आहेत. याआधी देखील वासुदेव नेत्रालयाने जल हि जीवन है, अवयव दान –श्रेष्ठ दान,आता फुलराणी जळणार नाही तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री,भारत सरकार यांचे शेतकरी बंधूना आवाहन असे उपक्रम याच पद्धतीने राबविले आहेत.

भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचा पूर्व संध्येला भुसावळाताील स्टार लॉन येथे निमंत्रण पत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी रजनी सावकारे, प्रशांत पाटील, युवराज लोणारी, आदि उपस्थित होते. वासुदेव नेत्रालयाच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

Protected Content