जामनेर तालुक्यात विविध रस्ते कामांचे भुमीपूजन

jamner raste udghatan

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून विविध रस्ते कामांचे भुमीपूजन आज जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी विधान परिषद आमदार चंदूलाल पटेल, दिलीप खोडपे,जे.के.चव्हाण,चंद्रकांत बाविस्कर,जितेंद्र पाटील,निता पाटील,सुनिता पाटील, नवल पाटील,अमित देशमुख, अमर पाटील, विलास पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, अमर पाटील, स्वीय सहाय्यक दिपक तायडे, रामेश्‍वर पाटील, रमण चौधरी,आंंनदा पिठोडे,गटविकास अधिकारी अजय जोशी, तहसीलदार नामदेव टिळेकर, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे,वन अधिकारी समाधान पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे आदी पदाधिकारी व अधिकारी यावेळी हजर होते.

तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत ४८ कोटी रूपयांच्या रस्त्यांना मान्यता मिळाली असून.आज त्या सर्व रस्त्याचें भुमीपुजन करून प्रत्यक्ष कामांना आज सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ना. गिरीश महाजन म्हणाले की, भविष्यात तालुक्यातील प्रत्येक रस्ता चांगल्या स्वरूपात असणारा महाराष्ट्र राज्यातील एकमेव तालुका म्हणून जामनेर तालुका ओळखला जाईल. रस्त्यांंसोबतच संरक्षण भिंती, मोर्‍या आणि पुलांचेही काम यावेळी करण्यात येणार असून बोदवड उपसा सिंचन योजनेचेही काम लवकरच पुर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वाघारी देऊळगाव या भागात तलाव मोरीचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोडशेडिंग व ट्रान्सफॉर्मर या समस्या आमच्या शासनाच्या काळात संपल्या आहे. गडकरी यांचे रस्त्यांची कामे डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत. गावाच्या विकासासाठी सरपंच व ग्रामसेवक यांची मह्त्वाची जबाबदारी असून त्यांंनी प्रामाणिकपणे कामे केल्यास गावाचा विकास शक्य आहे. निराधारांना मिळणार्‍या मानधनात वाढ करण्यात आली असून त्यांची रक्कम रूपये सहाशे वरून एक हजार करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच लोकसभे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आपले बहुमतात सरकार येईल असा विश्‍वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Protected Content