फैजपूर येथे मॉबलिंचींग घटनेचा निषेध

nished

फैजपूर प्रतिनिधी । येथील एम.मुसा जनविकास सोसायटी व असंघटित कामगार संघटनातर्फे आज (दि. 5 जुलै) रोजी उपविभाय प्रांत कार्यालयात झारखंड येथील मॉब लिंचींग घटनेबाबत निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मॉब लिंचींग घटनेत झारखंड येथील तरुण तरबेज अन्सारी या तरुणाला जमावाकडून अमानुषपणे मारहाण करून झालेल्या मुत्युचे व जयपूर येथे मानव जातीला काळिमा फासणारी सात वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार घटनेची जाहीर निषेध करतो. झारखंड मधील २४ वर्षीय तरुण तरबेज अन्सारी याला येथील जमावाने बेदमपणे मारहाण केल्यामुळे त्याचा मुत्यु झाला, अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी कधी गोरक्षकचे नावावर बीफ लाळले. या संशयावरून अनेक लोकांचे बळी गेले. या घटनेवर सरकार नेहमी कानाडोळा करीत असून, आश्या घटनांमुळे देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झालेला असून हे राष्ट्रीय एकतेला तळा देणारा आहे. अश्या घटना होऊ नये यासाठी सरकारने कायदेत तरतूद करावी व कठोर शिक्षेचा कायदा पारित करावा. तसेच जयपूर येथील शास्त्री नगर येथील सात वर्षीय मुलीला घरातून ओडून नेत तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून, तिला दोन तासानंतर सोडून देण्यात आले. यामुळे जगात भारतीय गरिमेस मोठा धक्का बसला आहे. या राष्ट्रीयाचे कायदे मोडणारे संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात येवून कठोर शिक्षा हवी. दोन्ही पीडितेस शासनाकडून आर्थिक मदत करुन त्याचे कुंटुबांना योग्य न्याय मिळून दयावे असे निवेदनात म्हटले आहे.

Protected Content