मॉब लिंचींगच्या निषेधार्थ भुसावळात मूक मोर्चा ( व्हिडीओ )

silent march bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । झारखंडमधील मॉब लिंचींगच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, झारखंडमध्ये जमावाने तबरेज अन्सारी या युवकाची मारपीट करून हत्या केल्यामुळे खळबळ उडाली असून याचा देशभरात निषेध करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज भुसावळ शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. मोर्चाची सांगता झाल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यात जमावाने केलेल्या मारहाणीच्या (मॉब लिंचींग) विरूध्द सक्षम कायदा बनविण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, देशातील सर्व अल्पसंख्यांक समुदायाच्या सुरक्षेसाठी कायदा बनविण्यात यावा, झांरखंडच्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रकरणात दिरंगाई करणारे पोलीस आणि डॉक्टरर्सलाही आरोपी करण्यात यावे, तबरेज अन्सारीच्या कुटुंबाला ५० लाख रूपयांची मदत देऊन त्यांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशा मागण्यात करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर फिरोज रहेमान शेख, हाफीज मोहंमद इरफान रजा, मो. अकील रजवी, मुफ्ती जावेद अब्बास रजवी, अ‍ॅड. वासिम शेख, शेख युनुस (मामा), रफीक शेख, मुजाहिद शेख, मो. सईद, मजहर शेख, कलीम शेख, साजीद बागवान व शेख निहाल मेहताब आदी मान्यवरांच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदन दिल्यानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मॉब लिंचींग प्रकरणाचा निषेध केला.

पहा : भुसावळातून निघालेला मूक मोर्चा आणि मान्यवरांच्या प्रतिक्रियांचा व्हिडीओ.

Protected Content