फैजपूर शहरात कोरोना विषाणूचे गांभीर्य नाही; पोलीसांची दांडूकेशाही (व्हिडीओ)

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जनता कर्फ्यु पाठोपाठ लॉकडाऊन आणि आता संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. मात्र नागरिक याविषयी फारसे गांभीर्याने घेत नसल्यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर तर उठबश्या व गाडीच्या चाकाची हवा काढत आहे, तर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले हे सकाळ पासूनच फैजपूर, यावल रावेर फिरत आहे.

जिल्ह्यासह राज्यात संचारबंदी लागू असताना नागरिक पूर्णपणे निष्काळजीपणाने रस्त्यावर वावरतांना दिसत आहे. वाहनांची गर्दी सकाळपासून फैजपूर शहरांमध्ये दिसून येत आहे. याचा प्रतिकार करण्यासाठी एकीकडे प्रशासन सुरक्षित राहण्याच्या सूचना देऊन घरातच थांबण्याच्या आवाहन करीत आहे तर दुसरीकडे टवाळखोरांचा व काही सामान्य नागरिक किरकोळ कामानिमित्त बाहेर पडून आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसून आले आहे. भाजीपाला विक्रेते आदेशाला जुमानत नाही.

शहरात बाजार न भरण्याचे आदेश असुनसुद्धा काही किरकोळ व्यापारी हमरीतुमरीवर येऊन प्रबोध फोटो स्टुडिओ जवळ बाजार भरून ठेवला त्यामुळे तिथे नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आदेशाचे पालन न करता हुकूमशाही दाखवत हे किरकोळ व्यापारी दादागिरी करून भाजीपाला विक्री करत होतो पालिका कर्मचारी येऊन त्यांना तेथून उठवून गावात फिरण्यास सांगितले. बाजारासाठी हात गाडीवरती भाजीपाला ठेवून वाड्यात, कॉलनीत फिरण्याचे आदेश मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिलेले आहे तरीसुद्धा ते आदेशाचे पालन न करता संपूर्ण नियम धाब्यावर बसवले जात आहे.

नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घरीच थांबा
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यु लॉकडाऊन करूनही नागरिक घराबाहेर पडत आहे. कोरोना या जीवघेणा आजाराचे नागरिक गांभीर्य लक्षात न घेता बिनधास्तपणे गावात फिरत आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतः व परिवारासह घरातच थांबून स्वतःची काळजी घ्यावी विनाकारण घराच्या बाहेर गावातील नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’तर्फे करण्यात येत आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3293070720722100

Protected Content