वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरसह चार मोटारसायकली जप्त

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व मदत करणारे चार मोटारसायकली जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील पाल परिसरातून अवैध वाळू वाहतूक थांबता-थांबे ना झाली आहे. मध्यरात्री सुकी नदीपात्रातुन रात्रीच्या वेळी सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक केली जात आहे. याकडे तहसीलदार बंडू कापसे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. पाल-खिरोदा बोर घाटातून रात्रीच्या सुमारास वाळूचे वाहने ये-जा करण्याची परवानगी कोणाच्या आशिर्वादमुळे देण्यात येते, याची चौकशी होण्याची गरज पर्यावरण प्रेमी कडून होत आहे.

तर दूसरीकडे परिवीक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे आपल्या टीमसह सोमवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री सावदा नजिक अवैध वाळूने भरलेल्या ट्रक्टरवर कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात वाळूने भरलेले ट्रॅक्टर आणि चार दुचाकी हस्तगत केल्या आहे. रात्री मोठ्या प्रमाणात पालकडून सावदा खिरोदा परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रक, आयशर आणि ट्रक्टरद्वारे वाळुची मोठी वाहतूक होत असते याकडे तहसीलदार बंडू कापसे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Protected Content