भुसावळ एमआयडीसीत आग; डिस्को एंटरप्रायजेसची कोट्यवधींची हानी ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । येथील खडका गावाजवळ असणार्‍या औद्योगिक वसाहतीतल्या व्हीफॉरयू सेल कंपनीचा मालक गवत जाळत असतांना शेजारच्या डिस्को एंटरप्रायजेस या कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, खडका गावाजवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये व्ही.फोर.यु.सेल ह्या कंपनीचा मालक सकाळी वाढलेले गवत जाळत असतांना कंपनीत जाणारी केबल व डीपीने अचानक पेट घेतल्याने ती आग केबलव्दारे पुढे जाऊन शेजारील डिस्को एंटरप्राइजेस कंपनीला लागली. यामध्ये खुर्च्या व फ्रिज बनविण्याच्या मशनरी तसेच दोन ट्रक समान भरलेल्या जळून खाक झाल्या आहे. डिस्को एंटरप्रायजेस कंपनी कन्हैयालाल मकडीया यांच्या मालकीची असून या भीषण आगीमुळे अंदाजे तीन कोटीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आग विझविण्यासाठी भुसावळ नगरपरिषद अग्निशामक दलाचे दोन बंब, दिपनगरचे दोन व ऑडनन्स फॅक्टरीचे दोन अग्निशामन बंब तर चाहेल हॉटेल मालकाच्या ट्रॅक्टरच्या चार फेर्‍या मारण्यात आल्यानंतर आग आटोक्यात आली.

पहा : या भीषण आगीचा व्हिडीओ.

https://www.facebook.com/watch/?v=2765447777114109

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content