कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील मुक्ताईनगर तालुक्यातील १४ जण क्वारंटाईन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कालच कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झालेली बुलढाणा जिल्ह्यातील महिला मुक्ताईनगर तालुक्यातील मन्यारखेडा येथे बरेच दिवस मुक्कामी असल्याचे समोर आल्याने तिच्या संपर्कातील १४ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, काल सायंकाळी जळगाव वैद्यकीय रूग्णालयात उपचार घेणारे तीन रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे रिपोर्टमधून निष्पन्न झाले. यातील अमळनेर येथील एक गृहस्थ आधीच मृत झाले असून ते पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले. दुसरी महिला ही भुसावळ येथील तर तिसरी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी असून ती जळगावात उपचार घेत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. दरम्यान, यातील मलकापूर येथील महिला ही मध्यंतरी मलकापूर तालुक्यातील मन्यारखेडा येथे १३ दिवस आपल्या भाच्याकडे मुक्कामी होती. येथूनच तिला रूग्णालयात हलविण्यात आले आहे. आता ही महिला पॉझिटीव्ह आढळल्याने तिच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना प्रशासनाने तपासणी करून होम क्वॉरंटाईन अवस्थेत राहण्याचे निर्देश दिले आहेत.दरम्यान, याआधी त्यांची कोरोना चाचणी सुध्दा करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आलेली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content