नकली सोनं देवून सोनाराची सहा लाखांत फसवणूक !

धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धरणी चौकातील एका सोनाराला नकली (बनावट) सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याच्या नावाखाली तब्बल सहा लाख फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील धरणी भागात कौस्तुभ कैलास सराफ (रा. पंचमुखी हनुमान मंदिर जळगाव) यांचे रुद्र ज्वेलर्स नावाने दुकान आहे. कौस्तूब सराफ यांच्याकडे धर्मेंद्र यादव आणि एक अनोळखी व्यक्ती मागील काही दिवसांपूर्वी एक दोन वेळेस सोने तारण ठेवून पैसे घेऊन गेले होते. व्यवहार चांगल्या असल्याने कौस्तूभ याने धर्मेंद्र यादवकडून १९ ऑगस्ट रोजी १८ तोळे सोने तपासून ६ लाख ९ हजार ५०० रुपयामध्ये तारण ठेवले.

परंतु कौस्तूभ सराफ यांनी जळगाव येथे गेल्यावर सोन्याचे दागिने तपासून असता त्यावर फक्त काही अशी सोन्याचा मूलमा असून दागिने सोन्याचे नव्हे तर चांदीचे असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. कौस्तूभ सराफ यांच्या फिर्यादीवरून धर्मेंद्र यादव व एक अनोळखी इसम अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार योगेश जोशी हे करीत आहेत.

Protected Content