पाचोरा येथील शिक्षिकेचा कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित

पाचोरा प्रतिनिधी । मातृसेवा फाउंडेशन ठाणे, स्माईल टीम यवतमाळ आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्तमध्ये पाचोरा तालुक्यातील श्री. गो. से. हायस्कूलच्या श्रद्धा आसाराम पवार यांना सन्मानित करण्यात आले. 

राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर विजेत्या उपक्रमांची निवड केली गेली आहे. महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित हा उपक्रम राज्यात प्रथमच शिक्षक ध्येय तर्फे राबविण्यात आला आहे. राज्यातील विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह आणि प्रिंट सन्मानपत्र घरपोच पाठविण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र व्हाट्सऍप नंबरवर पाठविण्यात येईल.

राज्यातील १०७ महिलांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला असून ४६ महिलांना या ठिकाणी ‘कर्तृत्ववान महिला’ म्हणून पुरस्कार देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. राज्यातील कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त मध्ये पाचोरा तालुक्यातील श्री. गो. से. हायस्कूलच्या श्रद्धा आसाराम पवार यांना सन्मानित करण्यात आले. राज्यातील उपक्रमशील, कर्तृत्ववान महिलांनी या स्पर्धेत उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वीतेसाठी परीक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब गणपत बडे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांनी काम पाहीले.

Protected Content