प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातून ५२ हजारांच्या साहित्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्याचे उपकेंद्रच्या स्टोअर रूम मधून लोखंडी बेड, फोम गादी, सिलिंग फॅन आणि इतर सामान असा एकुण ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अज्ञात चोरट्यांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या ठिकाणी उपकेंद्रातील स्टोअरमध्ये आरोग्य विभागाच्या मालकीचे लोखंडी बेड, फोम गादी, सिलिंग फॅन आणि इतर सामान असा एकूण ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता समोर उघडकीला आले आहे. दरम्यान या संदर्भात सर्वत्र चौकशी केली असता चोरी केल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी ७ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. इरेश हेमंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे हे करीत आहे.

Protected Content