चोरीच्या तीन दुचाकींसह चोरटा पोलीसांच्या जाळ्यात; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातून दुचाकीची चोरी करणाऱ्या जिल्हा पेठ पोलीसांनी बी.जे. मार्केट परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत रामदास साळुंखे (वय-४३) रा. हिरा शिवा कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख जाफर शेख अनवर रा. पिंप्राळा हे त्यांची दुचाकी (एमएच १९ बीए ७६१२) ने 28 सप्टेंबर 2023 रोजी कामाच्या निमित्ताने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आलेले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान ही दुचाकी अज्ञात चोट्याने चोरून नेली होती. दरम्यान याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरीचा गुन्ह्याच्या शोध घेत असताना सीसीटीव्ही आणि गोपनिय माहितीच्या आधारे ही दुचाकी संशयित आरोपी चंद्रकांत साळुंखे यांनी चोरी केल्याची गोपनीय माहिती पोहेकॉ सलीम तडवी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना सांगितली. त्यानुसार पोलीस निरीक्षक जयस्वाल यांनी पथक तयार करून संशयित आरोपीवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम तडवी, जुबेर तडवी, अमितकुमार मराठे, मिलिंद सोनवणे यांनी कारवाई करत गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे याला बी.जे. मार्केट परिसरातून अटक केली. त्याने चोरी केलेल्या एकुण तीन दुचाकी काढून दिल्या. याप्रकरणी त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे हे करीत आहे.

Protected Content