मागील भांडणाच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मच्छीबाजारजवळ मागील भांडणाच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना काल गुरूवारी ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, संजय इच्छाराम पाटील (वय-४७) रा. उखळवाडी ता. धरणगाव ह.मु. सुप्रिम कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. काल गुरूवारी ५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास संजय पाटील एकटे घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी ईश्वर, पिन्या (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले.  त्यांना मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यातील ईश्वर याने  लाकडी काठी उचलून संजय पाटील यांच्या डोक्यात टाकली. यात संजय पाटील जखमी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुरूवारी रात्री १० संजय पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे. 

 

Protected Content