तरूणानं केलं अस काही… दरवाजा उघडताच कुटुंबाचा आक्रोश !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. तरुणाची आई ही वडनगरी येथे महाशिवपुराण कथा येथे गेली होती. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

महेश छगन गोसावी (वय ३६, रा. नवीन कुसुंबा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह नवीन कुटुंबा येथे राहतो. जळगाव मधील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये राज सिल्वर पॅलेस येथे एका सुवर्ण व्यापाराकडे तो काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी तो घरी होता. त्यावेळेला कुठल्यातरी कारणाने त्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला. तातडीने महेश गोसावी याला कुटुंबीय व मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तिथे त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.

दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धावं घेतली. घटनेची माहिती जाणून घेत पुढील कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content