एटीएम रूममधील तीन बॅटऱ्यांची चोरी; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारून त्याच्या वायर तोडून एटीएममधील तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १० डिसेंबर रोजी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील जळके येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम मशीन लावण्यात आले आहे. रविवारी १० डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून त्याच्या वायर तोडल्या. त्यानंतर एटीएममधील २४ हजार रुपये किमतीच्या एकूण तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर दीपक दौलत तिवारी रा. सत्यम पार्क, जळगाव यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील करीत आहेत.

Protected Content