नाशिक-मुंबई मार्गावर कारमधून अडीच लाखांचा दारुच्या बाटल्या जप्त

thane

ठाणे वृत्तसंस्था । थर्टीफर्स्ट पार्टीसाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरु आहे. ही जय्यत तयारी सुरु असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नाशिक-मुंबई मार्गावर छापेमारी केली आहे. यात एका कारमधून मद्याच्या 30 बाटल्या जप्त केल्या आहेत. जवळपास 2 लाख 30 हजारांचा मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावर वरई नाका येथे बेकायदेशीर मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करण्यात येत होती. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने संभावित ठिकाणी नाशिक-मुंबई महामार्गावर सापळा रचला. यावेळी घटनास्थळी आलेल्या कारची तपासणी केल्यानंतर एका कारमध्ये रॉयल स्टेग 10, मॅक्डोनल 10 आणि इम्पेरिअल ब्ल्यू 10 अशा एकूण 30 मद्याच्या बाटल्या सापडल्या. याची किंमत 2 लाख 30 हजार रुपये आहे.

Protected Content