जळगाव जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीला स्थगिती

Jalgaon Zilla Parishad

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीला स्थगिती देण्यात आली असून यामुळे सीईओंकडे प्रशासक म्हणून प्रभार येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समिती सभापती निवडीचा जाहीर झालेल्या कार्यक्रमास प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी स्थगिती दिली. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी २१ डिसेंबर तर विषय समिती सभापतिपदासाठी २३ डिसेंबर रोजी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. मात्र शासनस्तरावरून या तारखांचा कार्यक्रम स्थगित करून पुढे ढकलला असून, नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, २० डिसेंबरपर्यंत जि.प.ची मुदत असल्याने २१पासून सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

Protected Content