भोसरी जमीन प्रकरणी त्रयस्थ अर्जदाराचा अर्ज मंजूर; खडसेंना धक्का

eknath khadse

पुणे प्रतिनिधी । भोसरी येथील बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात त्रयस्थ अर्जदाराचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. यामुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

याबाबत वृत्त असे की, भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) याप्रकरणात खडसे यांना क्लीन चिट दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. विशेष सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने गुगरूवाारी हा अर्ज मंजूर केला आहे. या संदर्भात अ‍ॅड. सरोदे याबाबत म्हणाले, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात पुरावे असतानाही त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कशा प्रकारे क्लीन चिट दिली आहे ही बाब पुराव्यानिशी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. या प्रकरणात आमचीही बाजू न्यायालयाने सुनावणीत ऐकून घ्यावी, अशी मागणी केली होती. परंतु याबाबत तारखा पडल्या असून न्यायाधीशांच्या बदल्या होऊनही आमचा अर्ज मान्य केला नव्हता. न्यायालयाने आमचा अर्ज व एसीबीने कशा प्रकारे खडसे यांना क्लीन चिट दिली याची कागदपत्रे पाहत अर्ज मंजूर केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी ९ जानेवारी रोजी होणार आहे.

Protected Content