बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दौरा – आ. संजय राठोड

चाळीसगाव प्रतिनिधी । राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राज्यव्यापी जन आशिर्वाद यात्रेला प्रारंभ केले असून हि यात्रा मंगळवार रोजी चाळीसगावात दाखल झाल्याने या पाश्वभूमीवर तालुक्यातील शिंदी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. संजय राठोड यांनी नंगारा वाजवून बंजारा समाजाच्या न्यायासाठी हा दौरा असल्याचे सुतोवाच केले.

राज्यातील बंजारा समाज हा आजही अतिमागास असून दरी खोऱ्यात वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे बंजारा समाजाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राज्यव्यापी जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात केलेली आहे. दरम्यान हि यात्रा मंगळवार, २९ रोजी चाळीसगावात दाखल झाल्याने या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील शिंदी येथे गोरख राठोड मित्र मंडळ व स्व. राजाभाऊ राठोड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संजय राठोड यांनी नंगारा वाजवून हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांचे कार्य आणि विचारांचा वारसा घेऊन मी बंजारा समाजाची सेवा करण्याचे व्रत घेऊन पुढे जात असल्याचे सांगितले. समाजाच्या अनेक प्रश्नांसाठी माझी लढाई सुरू असून येणाऱ्या काळात मला जिते संधी मिळेल अशा ठिकाणी प्रश्न मार्गी लावणार असल्याचे हि त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे समस्त बंजारा समाजाचा मला पाठिंब्या बरोबर आशिर्वादाची गरज आहे. त्याचबरोबर  न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व नेते माझ्या पाठीशी असून ज्यांना इतर पक्षांत राहायला आवडत आहे. 

त्यांनी खुशाल राहावे परंतु जेव्हा-जेव्हा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न येईल अशा वेळी सर्वांनी संत सेवालाल महाराजांची हाक देत एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. राठोड यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक व स्व राजाभाऊ राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

दरम्यान गोरख राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकेत बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे ३५० कोटी रुपयाचे विविध विकासकामे केल्याने बंजारा समाज आपल्या ऋणी असल्याचे सांगितले. याप्रसंगी सी.के. पवार, , मा.जि.प.सदस्य सुभाष चव्हाण, ज्येष्ठ नेते रामदास जाधव, मा.प.स.सभापती विजय जाधव, सुधाकर राठोड, सौ.अहिल्याबाई सोनवणे, नमोताई राठोड, सरपंच दिनकर राठोड, विनित राठोड, राजेंद्र राठोड, अनिल चव्हाण, डॉ. तुषार राठोड, भास्कर सोनवणे, ग्रा.पं.सदस्य पंकज गरुड, राहुल ठाकरे, राममाऊ राठोड, कैलास सवजी, दिलीप नथू, किसन राठोड तसेच मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content