धार येथील शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । गावात किरकोळ वाद झाल्याने मनात वाईट वाटून एका शेतकऱ्यांन शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोरख रामदास सोनवणे (वय-४५) रा. धार ता. धरणगाव हे शेतीचे काम करतात. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गावातील दोन मित्रांमध्ये काही किरकोळ वाद झाला होता. वादामुळे मित्रांमध्ये त्यांची शाब्दीक वाद झाला. दुपारी ४ वाजेनंतर ते गावातून गायब झाले. रात्री उशीरापर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईकांना शोधाशोध केली. ते घरी परतले नाही म्हणून त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या संपुर्ण गाव पालथे घातले. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास लहान मुलगा अनिल सोनवणे हा शेतात गेला असूप वडीलांनी शेतातील निंबाच्या झाडाला ठिककच्या नळीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केलेच्या आढळून आले. पोलीस पाटील यांच्या खबरीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Protected Content