खळबळजनक : माजी आमदारांसह बँकेच्या संस्थापक अध्यक्ष यांच्या अपहरणाचा कट उधळला !

खामगाव-अमोल सराफ । माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह बुलडाणा अर्बन बँकचे संस्थापक अध्यक राधेश्याम चांडक यांचे अपहरण करण्याच्या कट उधळत तीन संशयित आरोपींना दिल्लीतून इंटेलिजन्स ब्यूरो अर्थात आयबी पथकाने अटक केली आहे. तीनही संशयित आरोपी हे बुलढाणा शहरात असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा चैनसुख संचेती या दोघांना अपहरणाची योजना रचल्याने समोर आले आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या मिर्झा आवेज बेग (वय-२१), शेख साकीब शेख अन्वर (वय-२०), उबेद खान शेर खान (वय-२०) यांना अटक केली आहे. तीघेही बुलडाणा शहरातील शेर-ए-अली चौकातील राहीवाशी असल्याचे समोर आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे संशयित आरोपी हे काही दिवसांआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. तिथे बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा योजना आखली होती. बँक लुटण्यासाठी त्यांनी एक एअरगन देखल खरेदी केली होती. बँक लुटल्यानंतर कार खरेदी करून ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करून कोट्यवधी रुपये कमवायचे, अशी योजना आखली होती. दरम्यान दिल्लीत आयबी पोलिसांना या सुगावा लागल्यानंतर संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले. बुलडाणा पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन तिनही संशयितांना बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीसांच्या चौकशी दरम्यान राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांचे अपहरण करणार होते असे माहिती पोलीसांनी दिली. पोलिसांनी तिघांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयबीने वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Protected Content