आरटीओ विभागातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ; आरोपी अटकेत

जळगाव प्रतिनिधी । शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला रामानंदनगर पोलीसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, चंद्रशेखर शंकरराव इंगळे (वय-५१) रा. जळगाव हे आरटीओ कार्यालयात कर वसुली अधिकारी म्हणून नोकरीस आहे. त्यांच्या कार्यालयातील सहकारी दिलीप रामभाऊ पाटील यांच्या खासगी गाडीवरील चालक अक्षय बोदडे रा. समता नगर यांन २८ मे २०२० रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास येवून चंद्रशेखर इंगळे यांना शिवीगाळ करून ‘तू इथे कसे काम करतो ते मी पाहतो, मला खर्चाला एक हजार रूपये दे, नाहीतर तु कार्यालयाच्या बाहेर आल्यावर मी तुला पाहून घेईल’ अशी बोलून टेबलावरील फाईन फेकून दिली. दरम्यान कार्यालय प्रमुख उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या समोर शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी अक्षय बोदडे हा तेव्हापासून फरार होता. दरम्यान, रामानंद नगर पोलीसांनी बुधवार ५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आरोपीस अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज इंद्रेकर करीत आहे.

Protected Content