धरणगावातील शिवसैनिकांवर कायदेशीर कारवाईसाठी रिपांईचे आंदोलन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगावात शक्तीप्रदर्शन करीत महापुरूषांच्या स्मारकांना माल्यार्पण केले म्हणून धरणगावातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमीका घेत महापुरूषांच्या स्मारकांचे दुग्ध अभिषेक करून शुध्दीकरण केले. शिवसेनेने केलेल्या कृत्याचा रिपाईच्या वतीने रविवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आला.

 

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री  गुलाबराव पाटील यांनी शनिवारी १३ ऑगस्ट रोजी  धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून धरणगाव शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी महापुरूषांना माल्यार्पण केले म्हणून धरणगाव शहरातील शिवसैनिकांनी रविवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी महापुरूषांच्या स्मारकाचे दुग्ध अभिषेक करून शुध्दीकरण केले. या संदर्भात शिवसैनिकांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, संदीप बनसोडे, किरण अडकमोल, नागराज ढिवरे, जुलाल बाविस्कर, शंकर सोनवणे, आकाश नरवाडे, महिंद्र सपकाळे, अनिल कोळी, कैलास मिस्तरी, अजय शिंदे आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content