मनपाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर

WhatsApp Image 2020 02 11 at 8.47.01 PM

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हाधिकारी तथा प्र. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मनपाचा सन २०१९-२० वर्षातील सुधारित आणि सन २०२०-२१ चे मुळ अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर केले. ११४१.९६ कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक असून डॉ. ढाकणे यांनी हा प्रस्ताव स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांच्याकडे सुपुर्द केला आहे. तसेच अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सभा तहकुब करण्यात आली.

महापालिकेच्या सन २०१९-२० चे सुधारीत व सन २०२०-२१ चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ३ वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्र आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाच्या वतीने अंदाजपत्रक सादर केले. यावेळी उपायुक्त अजित मुठे, मिनिनाथ दंडवते, लेखा परीक्षक संतोष वाहुळे, लेखा अधिकारी अधिकारी कपिल पवार, नगरसचिव सुनील गोराणे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.मनपाचा अंदाजपत्रक सादर करण्यासाठी सभापती अ­ॅड.शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी व्यासपीठावर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे,उपायुक्त अजित मुठे,मिनिनाथ दंडवते,मुख्यलेखा परिक्षक संतोष वाहुले,मुख्यलेखाधिकारी कपिल पवार,नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेत सादर झालेल्या सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकात उत्पन्नाचा विचार करुन कोणतीही वाढ न करता उत्पन्न खर्चाचा अंदाज करण्यात आला असून सन २०२०-२१च्या मुळ अंदाजपत्रकात दैनीक बाजार शुक्ल वसुलीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आधी फेरीवाल्याकडून २० रुपये प्रतिदिवस पावती वसुल करण्यात येत होती तर, नवीन आर्थिक वर्षात फेरीवाल्यांकडून ५० रुपये पावती वसुल करण्यात येणार आहे.

१६८ कोटी शिल्लकीचे अंदाजपत्रक

नवीन आर्थिंक वर्षाकरीता १६८ कोटी ७५ लाखरुपये शिल्लकीचे हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. यात उत्पन्नाचा तपशिलमध्ये मनपा उत्पन्न ४५३.४४ कोटी असून महसुली खर्च ३५४.४७ कोटी इतका आहे.

Protected Content