दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश

मुंबई :  प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गेल्या पाच वर्षातील अनियमिततेची  चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे.

 

राज्य सरकारकडून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची मुंबै बँकेच्या चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दिले आहेत.

 

राज्य सरकारच्या निर्णयानंतर प्रवीण दरेकरांनी आज मुंबईत जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ही एकट्या प्रवीण दरेकरांची बँक नाहीय. यात राष्ट्रवादीचे ६ संचालक आहेत. यामध्ये शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर हे देखील संचालक आहेत. मग  केवळ द्वेषाचं राजकारण करायचं म्हणून मुंबै बँकेची चौकशी सुरु केलेली आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.  आपण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सगळ्या जिल्हा बँकांच्याविरोधात ईडी, सीबीआय आणि केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले.

Protected Content