कोरोना : नशिराबाद येथे ‘यम’ करतोय घरात राहण्याचे आवाहन

नशिराबाद, प्रतिनिधी । कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून देशभरात लॅकडाऊन ठेवून संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. मात्र अद्यापही लोकांना त्याचे गांभीर्य नसल्याने लोक रस्त्यावर येत आहेत. या नागरिकांच्या प्रबोधनासाठी नशिराबाद ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे थेट यमाच्या वेशात उतरून गावातील मुख्य चौकात जनजागृती केली आहे.

कोरोनासाठी नियम न पाळल्यास उद्भवणाऱ्या समस्यांबाबत भावनिक साद या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घातले. ग्रामपंचायत कार्यालयापासून गावातील प्रमुख रस्त्यावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली. ग्रामपंचायत कर्मचारी हे मृत्यची देवता यम याची वेषभूषा करून रॅलीत सहभागी झाले होते. त्याच्या मागे ‘स्वर्ग रथ’ गाडी व यागाडी मागे नागरिक विविध घोषवाक्य असलेले फलक हातात घेऊन शिस्तीने सोशल डिस्टन्स पाळून सहभागी झाले होते. कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी घरातच थांबा, सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करा. मास्क लावा, रुमालाचा वापर करा, अशा विविध घोषणा देत जनजागृती केली. तर कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या जनजागृती रॅलीत संतोष रगडे, पराग बऱ्हाटे, विनोद चिरावंडे, दिपक नाईक, भास्कर माळी, ललित भोळे आदींसह कर्मचारी या ठिकाणी जनजागृती रॅलित उपस्थित होते.

Protected Content