मौलाना कलीम सिद्दीकी यांची त्वरीत सुटका करण्याची मानियार बिरादरीची मागणी

जळगाव प्रतिनिधी । भारताचे मौलाना कलीम सिद्दीकी यांना उत्तर प्रदेश सरकारने अटक करून त्यांच्यावर धर्मांतरण अंतर्गत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहे. त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी अशी मागणी जळगाव माणियार बिरादरीच्या वतीने करण्यात आली. आज गुरूवार २३ सप्टेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताचे मौलाना कलीम सिद्दीकी यांना उत्तर प्रदेश सरकारने अटक करून त्यांच्यावर धर्मांतरण अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे ते गुन्हे त्वरित मागे घेऊन धार्मिक नेते मौलाना कलीम सिद्दीकी व मौलाना सज्जाद नोमानी व त्यांचे सहकारी यांची त्वरित सुटका करा. राजकीय नेते खासदार असोद्दीन ओवेसी व खासदार आझम खान यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर होत असलेल्या अन्याय थांबायला पाहिजे व त्यांची सुध्दा सुटका होणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेश सरकार ज्या पद्धतीने भारतातील कायदा व सुव्यवस्थेची थट्टा करीत आहे व त्यामुळे आरोग्य व दोन समाजात तेढ निर्माण होत आहे, ती त्वरित बंद करावी. अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन अप्पर जिल्हाअधिकारी प्रवीण महाजन यांना शहराध्यक्ष सैयद चाँद यांच्याहस्ते हे निवेदन देण्यात आले. जळगाव जिल्हा मनियार बिरदारीने जिल्हा प्रशासनाच्या  माध्यमाने भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री यांना हे निवेदन दिले आहे. निवेदन देतांना बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारूक शेख, शहर अध्यक्ष सैय्यद चाँद, सलीम मोहम्मद, हारून शेख, अब्दुल रऊफ, फझल कासार, मोहसीन युसूफ, ताहेर शेख, साबीर सैयद, मुजाहिद खान यांची उपस्थिती होती.

 

Protected Content