ज्ञानेश्वर मुळेंनी स्वताः जवळील सुगंध, ज्ञान प्रकाश जगात सगळीकडे पसरवला : विकास सिरपूरकर

sss

नागपूर (वृत्तसेवा) ज्ञानेश्वर मुळेंनी स्वताः जवळील सुगंध, ज्ञान प्रकाश जगात सगळीकडे पसरवला, असे प्रतिपादन सुप्रीम कोर्टाचे न्यायमुर्ती  विकास सिरपुरकर यांनी केले. परराष्ट्र खात्यातील निवृत्त सचिव तथा लेखक व विचारवंत ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर शुभांगी मुळेंनी लिहलेल्या ‘सृजनशील जगनमित्र’ या पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सिरपूरकर व विश्राम जामदार  उद्योजक व व्हीएनआयटीचे प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थित नुकतेच पार पाडले.

 

परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणारे व त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास वर्णन करणारे हे पुस्तक आहे. यावेळी न्यायमुर्ती विकास सिरपूरकर यांनी अभ्यासपूर्ण आणि साध्या सोप्या भाषेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचं व्यक्तिमत्व रेखाटल्या बद्दल लेखिका शुभांगी मुळे यांच विशेष कौतुक केलं.   विशेष अतिथी विश्राम जामदार म्हणाले की “कुटुंबात किंबहूना संयुक्त कुटुंबात जडण घडण आणि व्यक्तिमत्व विकास आगळाच असतो. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवनावर आधारित ‘सृजनशील जगनमित्र’ या पुस्तकातून ही संवेदनशील, माणुसकी जपणारी, मदतीची अनोखी वाट जोपासणारी व्यक्ती आहे ह्याचा प्रत्यय येतो. ही व्यक्ती हरहुन्नरी आहे. हात आकाशाला भिडलेला पण पाय जमिनीवरच टेकलेल्या डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवनातून प्रेरणा मिळते.”

 

यावेळी पुस्तकाच्या लेखिका शुभांगी मुळेंनी यांनी ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर गौरवगीत सादर केले. ग्रंथाल ‘सृजनशील जगनमित्र ‘हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेले असून  नागपुरात क्रॉसवर्ड बुक सेंटर तर्फे हा प्रकाशन सोहळा साजरा करण्यासाठी सहकार्य केले. नागपूरच्या उद्योजिका अरूणा पुरोहित आणि त्यांचे यजमान सचिन पुरोहित यांचे कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रॉसवर्डच्या पल्लवी देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलासजी काळे ,निधी काळे, प्रवीण अंबाडे ,सारिका पेंडसे यांनी परीश्रम घेतले.

Add Comment

Protected Content