पाचोऱ्याची स्मार्टसिटीकडे वाटचाल – ना. एकनाथ शिंदे

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी व प्रश्न समजुन काम केल्यानेच पाचोरा शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल होत आहे. पाचोरेकरांना कार्यसम्राट आमदार लाभला असुन पुढील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पाचोरा-भडगाव तालुक्यात एकही काम शिल्लक राहणार नसल्याचे राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

पाचोरा व भडगाव शहरात इतके भरीव कामे झालेली आहेत की, याचा इतरांनी हेवा वाटण्याजोगा आहे. मोठ्या शहरांनाही लाजवेल अशी विकास कामे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून झालेली आहेत. यामुळे आमदार किशोर पाटील यांचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. ते प्रामाणिकपणे काम करीत असतांना त्या कामाची गरज व आवश्यकता पटवुन आमचे कडुन कामे मंजुर करुन घेतात. ही त्यांची इतरांपेक्षा वेगळी शैली आहे. उर्वरित कामांची त्यांनी आज जी मागणी केली आहे. ते देण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचेही ना. शिंदे यांनी सांगितले. 

पाचोरा शहरात ना. एकनाथ शिंदे यांचे सुमारे साडेतीन तास उशिरा आगमन झाले. त्यांना मुंबई येथे परत जाण्याची घाई असल्याने उपस्थित नागरिकांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील हे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते. मात्र वेळे अभावी आमदार किशोर पाटील यांचे प्रास्ताविक आणि ना. एकनाथ शिंदे यांचे केवळ १० मिनिटे झालेले भाषण यावर कार्यक्रम आटोपता झाला. माजी मंत्री स्व. के. एम. (बापु) पाटील व्यापारी भाजी मंडई संकुलात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, कन्नडचे आमदार उद्यसिंग राजपुत, संपर्क प्रमुख संजय सावंत, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णु भंगाळे, तालुका संपर्क प्रमुख सुनिल पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्षा प्रियंका पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, डॉ. प्रा. अस्मिता पाटील, न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, न. पा. गटनेत्या सुनिता किशोर पाटील, मुकुंद बिल्दीकर, संजय कुमावत, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, डॉ. प्रियंका पाटील, युवानेते सुमित किशोर पाटील व्यासपीठावर होते.

पाचोरा येथे ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते  हिवरा नदीवरील कृष्णापुरी, पांचाळेश्वर मंदिराजवळील व स्मशानभूमी जवळील पुलांचे भुमिपुजन, माजी मंत्री स्व. के. एम. (बापु) पाटील व्यापारी भाजी मंडई संकुलाचे लोकार्पण, महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण व भडगाव शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानंतर ते सायंकाळी ५:५५ मिनिटांनी ते व्यापारी संकुलात हजर झाल्यानंतर कु. आरुषी संजय गोहील व कु. साक्षी किशोर बारावकर यांनी ना. शिंदे यांचे औक्षण केले. पाचोरा शहरातील उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक मुकुंद बिल्दीकर, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संजय कुमावत व प्रदिप पाटील यांचा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातुन केलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला. यावेळी नगरसेवक शितल सोमवंशी, रहेमान तडवी, धर्मेंद्र चौधरी, बापु हटकर, सतिष चेडे, आनंद पगारे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, प्रविण ब्राम्हणे, डॉ. भरत पाटील, युवा पदाधिकारी संदिप राजे पाटील, वैभव राजपुत, अनिकेत सुर्यवंशी, मोहीत राजपुत, समाधान पाटील, विशाल राजपुत, जितेंद्र पेंढारकर, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, सुनंदा महाजन, उर्मिला शेळके, स्मिता बारावकर, पदमाबाई महाले, चंदा ठाकरे, रेखा राजपुत किरणताई पाटील सह मोठ्या संख्येने महिला व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सी. एन. चौधरी यांनी केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!