जिल्हा वकील संघ निवडणूक १० सदस्य बिनविरोध

WhatsApp Image 2020 01 13 at 3.12.59 PM

जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सदस्य पदासाठी दोघांनी माघार घेतल्याने १० सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे. तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी २० जानेवारीला मतदान घेतले जाणार आहे.

अंतिम उमेदवारांची यादी मंगळवारी माघारीच्या वेळेनंतर दुपारी प्रसिद्ध करण्यात आली. सदस्य पदांसाठी अर्ज भरलेल्यांमधून अॅड. नरेंद्र पाटील व अॅड. स्वप्नील निकम यांनी मंगळवारी माघारीच्या अंतिम दिवशी माघार घेतली. त्यामुळे उर्वरीत उमेदवार अॅड.समाधान पावसे, अॅड. वैशाली चौधरी, अॅड. भूषण सोनवणे, अॅड. नवलसिंग नाईकडा, अॅड. संजय खडके, अॅड. इस्माईल पटेल, अॅड. प्रवीण राक्षे, अॅड. सचिन अग्रोया, अॅड. मिताली वाणी, अॅड.गणेश सावळे यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. आर. एन.पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड. ए. आर. सरोदे, अॅड. शिरीन अमरेलीवाला यांनी दिली. दरम्यान, वकील संघाच्या निवडणूकीमध्ये आता अध्यक्षपदासाठी अॅड. दीपकराज खडके, अॅड. किशोर भारंबे, अॅड.दिलीप बोरसे तसेच उपाध्यक्ष पदांसाठी अॅड. प्रभाकर पाटील, अॅड. सुभाष तायडे हे रिंगणात आहेत. तर सचिव पदासाठी अॅड. नत्थू पाटील, अॅड. दर्शन देशमुख, सहसचिव पदांसाठी अॅड. चेतना कलाल, अॅड. स्मिता झालटे, अॅड. मंजुळा मुंदडा, अॅड. प्रतिभा पाटील, कोषाध्यक्ष पदांसाठी अॅड. संजय रुणवाल, अॅड. शरद न्हायदे हेदेखील रिंगणात असून वरील पदांसाठी सोमवार दि. २० रोजी सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहेत.

Protected Content