नॉयलॉन मांजा विक्री तसेच वापरावर 24 जानेवारीपर्यंत बंदी

images 6

 

जळगाव (प्रतिनिधी) मकरसंक्राती निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉन मांजा विक्री तसेच वापरावर अपर जिल्हादंडधिकाऱ्यांनी 24 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.

 

मांजा (दोरा) हा नॉयलॉन स्वरूपात वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मकर संक्रांतीचे अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी नॉयलॉन दोरा मांजा या धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दोन पतंगामध्ये (दोऱ्यांचे) घर्षण होवून मोठ्या प्रमाणात मांजा तुटून उंच झाडे व इमारतींवर अडकतो. त्यामुळे वनपक्षी यांचे जिवितास धोका निर्माण होवून पशु-पक्षी जखमी/मृत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यात फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये 14 जानेवारी ते 24 जानेवारी, 2020 दरम्यान पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या नॉयलॉन मांजा निर्मिती, विक्री व वापरावर सक्त बंदी घालण्याचे निर्देश वामन कदम, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी दिले आहेत.

Protected Content