उत्तमराव पाटील यांना महाराष्ट्र केळी रत्न पुरस्कार जाहीर

भडगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील बात्सर गावातील आदर्श शेतकरी उत्तमराव रामभाऊ पाटील यांना केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

भडगाव तालुक्यातील बात्सर या छोट्याशा गावात एक आदर्श केळी उत्पादक होणं तेवढे सोपे नाही उत्तमराव पाटील हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून केळीचे पीक आपल्या शेतात विविध प्रयोग करून पिक घेत असतात. गेल्या पाच ते सात वर्षांपासून ते आपली शेती ही अर्धी रासायनिक खतांचा वापर करून तर अर्धी शेती सेंद्रिय पध्दतीने तयार करत असतात, त्याचा सेंद्रिय शेती वर जास्त भर देत आहेत प्रतिकुल हवामानात देखील दर्जेदार उत्पादन घेणारे तरूण आदर्श शेतकरी म्हणून उत्तमराव पाटील यांच्या कडे पाहिले जात आहे.

 

शेती करत असतांना अनेक हवामान संकटे आली त्यामधून सुध्दा ते विविध प्रयोग करून केळी पिक असतात तसेच ते परिसरात तील शेतकरी बंधुंना नेहमी सेंद्रिय शेती ची माहिती देत असतात त्यामुळे त्यांच्या कार्याची व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या हिताची बाब लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार सोहळा दि.23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 प्रभाकर महाजन बहुउद्देशीय सभागृह सावदा ता रावेर येथे कार्यक्रम मध्ये प्रदान करण्यात येणार आहे.

 

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे परिसरातुन अभिनंदन होत आहे तसेच उत्तमराव पाटील यांनी कुषी क्षेत्राचे शिक्षण ही घेतल्यामुळे त्यांना यात जास्त वाव मिळत असतो त्यांना पुरस्कार मिळाला वर ते आज समाधानी आहेत एवढ्या वर्षात मला केळीरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मी आनंदी आहे

Protected Content