माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत शासकिय कर्मचाऱ्यांची तपासणी

 

शेंदुर्णी, प्रतिनिधी । माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत शासकिय कर्मचारी यांची कोविड-१९ तपासणी करण्यात आली. तपासणीचे आयोजन सरस्वती प्राथमिक व श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र ,शेंदुर्णीच्या वतिने करण्यात आले.

स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,शेंदुर्णी ,सरस्वती प्राथमिक ,श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम, समुदाय आरोग्य अधिकारी डाँ .आदित्य पाटील , डॉ. श्रद्धा पाटील, आरोग्य सहाय्यक गजानन माळी, सहाय्यिका राजश्री पाटील, मदतनीस किशोर कोळी, विशाल बैरागी यांनी सहकार्य केले. सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील , श्रीकृष्ण माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शिला पाटील , स्व शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद खलचे , उ.मा.विभाग प्रमुख .व्हि .के .वाघ, वरिष्ठ लिपिक भाऊसाहेब सुनिल कुलकर्णी, सरस्वती व श्रीकृष्ण शाळेचे अजय सुर्यवंशी, अरूण धनगर , फकिरा गुजर ,हिवाळे यांनी सहकार्य केले.

Protected Content