नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकयांचा सत्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |   महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल येथे नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचा गौरव सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आले.

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अपर्ण करून पुजन करून आदरांजली वाहण्यात आली.

 

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना नियमित पिक कर्ज परतफेड हि एक संस्कृती विकसीत व्हावी. तसेच शासना मार्फतच्या व्याज सवलत योजना व प्रोत्साहन पर मोबदला यांची सर्वसामान्य शेतकरी यांना माहिती देण्यासाठी बँकेने हा उपक्रम हाती घेतला आहे अशी माहिती यावल महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेचे शाखा व्यवस्थापक आर.बी.हिंगणेकर यांनी दिली .

या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या यावल शाखा कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यावल नगर परिषदचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते हे होते.    राकेश कोलते व प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांच्या हस्ते नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे सन्मानपत्र व पुष्पगच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी बांधवांच्या हितासाठी बँकेचे व्यवहार , शेतीसाठी कर्ज मिळवणे व नियमीत कर्ज भरण्या संदर्भात आपले मार्गदर्शन केले .

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे अविनाश सोनोने यांनी तर उपस्थितांचे आभार शाखेचे अधिकारी  मयूर पवार यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन अधिकारी विक्रम धकाते यांनी केले आणि या प्रसंगी शाखेचे महेश खाचणे व भूषण महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेतकऱ्यांनी बँकेतर्फे झालेल्या या सन्मान बद्दल आनंद व्यक्त केला.

Protected Content