रोटरी व आधारतर्फे बालकांना ड्रेससह किट वाटप

अमळनेर प्रतिनिधी | येथील आधार संस्था आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रूबजी नगर भागातील बालकांना ड्रेस आणि किटचे वाटप करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, आधार संस्था संचलित विप्रो केअर्स सह्यायीत आधार शहरी आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून व रोटरी क्लब यांचा सहयोगाने तसेच इंडियन ऑइल दिवसा निमित्ताने ताडेपुरा भागात ० ते १ वर्षां आतील बालकांना ड्रेस व किट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे प्रेसिडेंट वृषभ पारख ,क्लब सेक्रेटेरी प्रतिक जैन यांच्यासह माजी अध्यक्ष अभिजित भांडारकर, महेश पाटील,ताह बोहरी, योगेश येवले, देवेंद्र कोठारी,दिनेश रेझा यांची मुख्य उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ भारती पाटील, कार्याध्यक्षा रेणू प्रसाद, वैशाली शिंगाने, तैशीफ शेख ज्योती सूर्यवंशी आरोग्यमित्र उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ भारती पाटील यांनी सर्व महिलांना स्वत:चे आरोग्याचे तसेच मुलाच्या आरोग्याचे महत्त्व पटवून दिले व काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन केले आभार व सूत्रसंचालन वैशाली शिंगाने यांनी केले.

Protected Content