हमीद शेख मोहम्मद मोमिन यांचे निधन

यावल प्रतिनिधी । येथील डांगपुरा परिसरातील राहणारे सामाजीक कार्यकर्ता व शांतता समिती सदस्य हमीद शेख मोहम्मद यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. 

यावल येथील डांगपुरा परिसरातील राहणारे शांतता समितीचे जेष्ठ सदस्य व मोमीन बिरादरीचे अध्यक्ष हमीद शेख मोहम्मद मोमीन यांचा यावल चोपडा मार्गावरून सकाळी ८ वाजेच्या सुमारास जात असतांना चोपड्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्यांना उडवुन पड काढला होता. दरम्यान यावलच्या जागृत नागरीकांनी तात्काळ या घटनेची माहीती देत अपघात करून पळुन जाणारा हरीयाणा येथील ट्रक अडावद पोलीसांच्या मदतीने पकडण्यात आला होता. तर अपघातात गंभीर जखमी झालेले हमीद शेख मोहम्मद मोमीन (वय-७०) वर्ष यांना नागरीकांच्या मदतीने उपचारासाठी (दि.२८ जानेवारी) रोजी जखमी अवस्थेत गोदावरी या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. दरम्यान १५ दिवसांपासुन उपचार सुरू असतांना आज दि. १३ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले असुन हमीद शेख मोहम्मद यांच्या पश्चात पत्नी चार मुली, तिन मुल, सुना, नांतवंडे असा परिवार आहे.

 

Protected Content