भुसावळात भाजपला भयाण धक्का; नगरसेवकांचे आप्त राष्ट्रवादीत

जळगाव प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांनी भाजपला सर्वात मोठा दणका भुसावळात दिला असून तेथील नगराध्यक्षांसह बहुतांश नगरसेवक व नगरसेविकांच्या कुटुंबियांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे आता भुसावळ नगरपालिका अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीच्याच ताब्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

भुसावळ नगरपालिकेत नगराध्यक्षांसह बहुतांश नगरसेवक हे एकनाथराव खडसे यांचे समर्थक असल्याची बाब उघड आहे. तथापि, आजच पक्षांतर केले तर अपात्रतेसह अन्य तांत्रिक बाबींची कटकट मागे लागू शकते. यामुळे आजवर शहरातून कुणी राष्ट्रवादीत प्रवेश केला नव्हता. तथापि, आज जळगावातील परिवार संवाद कार्यक्रमात नगरसेवक व नगरसेविकांच्या आप्तांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यात नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या पत्नी तर नगरसेविकांच्या पतींचा समावेश आहे. तर स्वीकृत नगरसेवक तथा नाथाभाऊंचे कट्टर समर्थक प्रा. सुनील नेवे यांनी देखील राष्ट्रवादीचा झेंड हाती घेतला आहे.

आज भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ.भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी नगसेवक दत्तू सूरवाडे, हेमलता इंगळे, माजी नगरसेवक राहुल मकासरे, नगरसेविका पती-प्रशांत अहिरे, किशोर पाटील, वसंत पाटील, माजी भाजप अध्यक्षा पुरूषोत्तम महाजन,
आशिक मुन्ना तेली, माजी नगरसेविका सोनल महाजन, नगरसेविका पत्नी-सौ.पौर्णिमा प्रमोद नेमाडे, प्रिया बोधराज चौधरी, शालिनी भागवत कोलते, प्रिती मुकेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष शेख शफी शेख अजीज, शहर भाजपचे माजी उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी पं.स.सदस्य प्रभा सपकाळे, दर्शन चिंचोले, एजाज खान खलील खान, आरती दिनेश नेमाडे, अनिकेत सुधीर पाटील, आशिष महाजन, पृथ्वीराज पाटील, विनय बऱ्हाटे, सुमित बऱ्हाटे, यशांक पाटील, माजी नगरसेवक किरण महाजन, निलेश वारके, चैताली अमोल इंगळे, प्रशांत नरवाडे, गणेश पाटील, संघदीप नरवाडे, माजी नगरसेवक शेख चिराग शेख गुलाब, जलील कुरेशी, शेख पापा शेख कालू, शेख निवाम शेख निमामुद्दीन, इस्माईल अकबर मेनन, अजीम खान खलील खान, आफताब खान, मो अमीन मो बिसार कुरेशी, शेख शब्बीर शेख इस्माईल, बिस्मीला तडवी, हसनूददीन पेंटर, रहेमूदीन, शेख रउप शे गनी, डॉ. निलेश झोपे, अब्बास शाह, रहीम शाह, वासीम खान आजीम खान, झाकीर खाटीक, रेहान कुरेशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

एकूण ३१ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्यांचा सत्कार केला. यामुळे इन-डायरेक्टर पध्दतीत नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

आ. सावकारे समर्थकांचे आप्त मात्र दूर

एकीकडे नगरपालिकेतील तब्बल १८ नगरसेवकांच्या आप्तांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी आमदार संजय सावकारे यांचे कट्टर समर्थक समजले जाणार्‍या युवराज लोणारी, राजू आवटे, राजेंद्र नाटकर, पिंटू कोठारी आदी नगरसेवकांच्या आप्तांंनी मात्र भाजपमध्येच राहणे पसंत केले आहे.

Protected Content