…तेव्हा तुमची लायकी नव्हती का ? : पडळकरांचा खोचक प्रश्‍न

पंढरपूर । पडळकरांचे निवडणुकीत डिपॉजीट जप्त झाल्याने त्यांची दखल घेऊ नका अस वक्तव्य करणार्‍या अजित पवार यांना उत्तर देत, ”पार्थ पवार पराभूत झाले तेव्हा तुमची लायकी नव्हती का ?” असा खोचक प्रश्‍न विचारला आहे.

गोपीचंद पडळकर ( ( Gopichand Padalkar ) यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत अजित पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली. तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची इतकी दखल घेण्याची गरज नसल्याचे म्हटले होते.

अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचलीय. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही, उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. भाजपसारख्या प्रमुख पक्षाकडून तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

खोचक टिप्पणी करणाऱ्या अजित पवार यांना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवार पडले तेव्हा तुमची लायकी नव्हती का, असा बोचरा सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारला. ते पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या टीकेची परतफेड केली. 2019 मध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला होता. हाच मुद्दा पकडत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Protected Content