राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल हे पद घटनात्मक असतांना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे ? याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत असल्याचे विरोधकांनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे. दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे.

सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी विविध कारणांवरून राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावर सुद्धा विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. सोबतच, विधिमंडळाच्या या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी सुद्धा केली आहे. यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, नोकरभरती, मुंबईचा विकास आराखडा आणि भ्रष्टाचार इत्यादींमुळे अधिवेशन वादळी ठरणार अशी चिन्हे आहेत.विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांची खरडपट्टी काढली. चहापान काही सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित येऊन चर्चा करण्याचे व्यासपीठ असल्याचे म्हटले आहे.

Add Comment

Protected Content