निवडणूकीआधीच ‘या’ राज्यात भाजपने जिंकल्या ८ जागा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अरूणाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूकीसोबतच विधानसभेच्या १९ एप्रिल रोजी निवडणूका होणार आहे. परंतू विधानसभेच्या निवडणूकीच्या आधीच भाजपने या राज्यात मोठी खेळी केली आहे. अरूणाचल प्रदेश येथील भारतीय जनता पक्षाचे आठ उमेदवार निवडणूक पार पडण्याआधीच विजयी झाले आहे. या उमेदवारांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आहे. विधानसभेत भाजप विजयी झाल्यास पेमा खांडू पाचव्यादा मुख्यमंत्री बनतील. विरोधी पक्षातील नेत्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आणि अनेक नेत्यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे.

भाजपच्या विरोधात एकही उमेदवार निवडणूकीत उमेदवार नसल्यामुळे आठ उमेदवार विजयी झाले आहे. मतदान फक्त औपचारिकतेसाठी घेण्यात येईल. मुख्यमंत्री पेमा खांडू मुक्ता विधानसभेच्या जागेवरुन, एर हेज अप्पा जीरो जागेवरुन, रोइंग जागेवरुन मुच्चू मीठी, सगाली जागेवरुन एर रातू तेची, ईटानगरमधून तेची कासो, ताली जागेवरुन जिक्को ताको, तलिहा जागेवरुन न्यातो डुकोम, दासंगलू पूल हयुलियांग विजयी मिळवला आहे. राज्यात विधानसभेत ६० जागा आहेत. तेथे २ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर लोकसभेच्या राज्यात २ जागा आहेत. तेथे ४ जूनला मतदान होणार आहे.

Protected Content