एकनाथराव खडसे यांच्यावरील ईडी चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध(व्हिडिओ)

मुक्ताईनगर, प्रतिनिधी  ।  गेल्या आठवड्या पासून माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांची व त्यांच्या कुटुंबियांची भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी केंद्र शासनाच्या अखत्यारित असणाऱ्या   ईडी या तपास यंत्रणे मार्फत चौकशी सुरू आहे त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यलय ते तहसील कार्यालय मोर्चा काढून मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देऊन हि चौकशी सूडबुद्धीने करण्यात असल्या कारणाने या चौकशीचा निषेध व्यक्त करण्यात आला  व हा प्रकार थांबला नाही तर आगामी काळात  आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीगेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळामध्ये व वर्तमानपत्राच्या माध्यमातून धमक्या देणे सुरू आहे .केंद्रातील सरकारच्या व महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांच्या विरोधात बोलले की, ईडी ची धमकी दिली जाते. विनाकारण नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. ईडी सारख्या स्वायत्त संस्थेचा वापर राजकीय स्वरूपात होतोय. ईडी च्या माध्यमातून असे भासवले जात आहे की ,तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात किंवा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलू नका, भ्रष्टाचारावर बोलू नका, सरळ सरळ असे वाटते की ईडी चा वापर भाजपाच्या कार्यालयातून होतोय. या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे.                                                                                                                                           राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते श्री.एकनाथराव खडसे यांना अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जातोय. वास्तविक पाहता भोसरी येथील जमिनीच्या  संदर्भात नाथाभाऊ यांनी  वारंवार सांगितले आहे की , ही जमीन एम.आय.डी.सी. ची नाही, सरकारची नाही, कोणत्याही प्रकारची भूसंपादनाची प्रक्रिया झालेली नाही. अथवा मूळ मालकाला जमिनी बाबतचा मोबदला सुद्धा दिलेला नाही .ही जागा एमआयडीसीचा ताब्यात नाही .त्यामुळे हा व्यवहार संपूर्णपणे खाजगी स्वरुपाचा आहे .सरकारचे या व्यवहारामुळे काहीही नुकसान झालेले नाही. हा व्यवहार सौ.मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्या नावाने असून तो अधिकृत आहे. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा रीतसर भरलेली आहे. श्री.एकनाथ खडसे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही त्यांच्या नावाने व्यवहार झालेला नाही. असे असताना जाणीवपूर्वक ईडी कडून त्यांना बोलावण्याचा प्रश्न च काय ? वास्तविक पाहता या प्रकरणाचे 2016 पासून पाच वेळा चौकशी झालेली आहे. न्यायमूर्ती झोटिंग कमेटी, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे, आयकर विभाग,  अँटी करप्शन ब्युरो (ACB)कडून चौकशी होऊन एसीबी मार्फत क्लोजर रिपोर्ट पुणे कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. या चौकशीत कोणतेही तथ्य आढळलेले नाही. परंतु श्री.एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तात्काळ ईडी कडून चौकशी सुरू झाली. यामध्ये राजकीय वास असल्याचे दिसून येते. यापूर्वी अनेक वेळ चौकशा होऊन सुद्धा पुन्हा ईडी ची चौकशी होते याचा अर्थ असा निघतो की, राजकीय दबावातून ईडी कार्य करीत आहे. भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का नाही ? असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. खडसे कुटुंबीयांना ज्या पद्धतीने छळले जातेय त्याचा आम्ही धिक्कार करतो. श्री.एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना खोट्या भोसरी जमीन प्रकरणात मुद्दाम गोवण्याचा प्रयत्न होत आहे. असा आमचा आरोप आहे.

महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात श्री एकनाथराव खडसे यांना मानणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्यांची राजकीय व सामाजिक ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची पायाखालची वाळू घसरू लागल्याने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने श्री.एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबियांवर कुरघोडी करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केलेला असून सदर प्रकार तात्काळ थांबवून त्यांचा मानसिक छळ थांबवावा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, प. स. सभापती सुवर्णा ताई साळुंखे,  प्रवक्ता सेल रावेर लोकसभा प्रमुख विशाल महाराज खोले, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील,माजी प. स. सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, सोशियल मीडिया जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष शाहीद खान, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना ताई कांडेलकर,राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष निता ताई पाटील,नंदाताई निकम, किशोर चौधरी,माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, सरचिटणीस रवींद्र दांडगे,कल्याण पाटील, डॉ बि. सी. महाजन,भागवत पाटील,चंद्रकांत बढे, लिलाधार पाटील,समाधान कार्ले, संदिप जावळे, रणजित गोयनका, शिवाभाऊ पाटील, कैलास पाटील, साहेबराव पाटील, गजानन पाटील, रउफ खान, विकास पाटील, राजेश ढोले,  मुन्ना बोडे,  प्रविण दामोदरे, निलेश खोसे, अनिल पाटील,  बापु ससाणे, प्रविण पाटील, वासुदेव बढे,  प्रेमचंद बढे,  विजय भंगाळे, सुनिल काटे, सुनिल पाटील, राजेंद्र पाटील, शेषराव पाटील, अप्पा नाईक, सुरेश हिरोळे, दिपक साळुंखे,मधुकर गोसावी,सदाशिव तायडे, ज्ञानदेव मांडो कार,अरूणाबाई पवार अक्काबाई भोसले ,जोगिंदर भोसले अंबादास पाटील,रवी पाटील,  गजानन खिराळकर,रमेश खिरळकर, पुंडलिक कपले, संतोष कांडेलकर, प्रदीप पुरी गोसावी, आशिष हीरोळे, कचरू बढे, अनंता कांडेलकर ,समाधान पाटील, योगेश पाटील, राजेश पाटील, धनराज कांडेलकर,छगन राठोड, संतोष पाटील, सोपान कोळी, हनिफ भाई,बाळा सोनवणे,सोपान कांडेलकर ,उमेश बोबंटकर ,राजेश बोरसे,नितेश राठोड, सदानंद भोसले ,भैया कांडेलकर, मयूर साठे,अजय आढायके, पवन चौधरी ,गजानन वंजारी, पंजाब राव पाटील,रमेश सुरवाडे,आणि असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/3066527440244021

 

Protected Content