भडगाव येथील तरूण चाळीसगावातून बेपत्ता !

चाळीसगाव  प्रतिनिधी । शहरातील बस स्थानक येथे लघुशंक करण्यासाठी गेलेला ३० वर्षीय तरूण हा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याबाबत शहर पोलिसात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.              

याबाबत वृत्त असे की, भिकन दयाराम पाटील (वय-५२ रा. बाबंरूड ता. भडगाव) हे वरील ठिकाणी पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यातील समाधान भिकन पाटील (वय-३०) हा गेल्या एक वर्षापासून मनोरूग्णं असल्याने विविध ठिकाणी त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. दरम्यान चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी दर्गा येथे समाधान याला नुकतीच उपचारासाठी आणले होते. तेव्हा समाधान याला घेण्यासाठी त्याचे आई-वडील चाळीसगावात ३ जूलै रोजी आले. रात्री १० वाजताच्या सुमारास शहरातील बस स्थानकावर असताना समाधान हा लघुशंक करण्यासाठी गेला. मात्र एक तास उलटून तो मुळ जागी परताला नाही. त्यावर पाटील दाम्पत्य यांनी परिसरात व नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली असता अद्यापपर्यंत मिळून आला नाही. म्हणून हरवल्याची खात्री झाल्याने भिकन दयाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात सोमवार रोजी दुपारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शैलेंद्र पाटील हे करीत आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!