पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली येथील सतरा वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पाचोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २२ जून रोजी दुपारी १ वाजेच्या  सुमारास मुलगी गावातून बेपत्ता झाली. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. तिचा दिवसभर शोधाशोध करूनही ती मुलगी घरी न आल्याने गुरूवार २३ जून रोजी नातेवाइकांनी पोलीसात धाव घेतली. पिडीत मुलीच्या भावाने तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!