Home क्राईम अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

0
41


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरण चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार २३ जून रोजी दुपारी मुलगी घरी एकटी असतांना गावातील अमोल राजेंद्र कोळी हा तिच्या घरात घुसूत तिचा हात धरून विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरड केली असता  अमोल कोळी हा पसार झाला होता. याबाबत पिडीत मुलीसह नातेवाईकांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल राजेंद्र कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound