धरणगावात सुवर्ण महोत्सवी शाळेत पूरक आहाराचे वाटप

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पूर्वीचे श्रीकृष्ण सॉमीलचे संचालक कै.रसिकलाल वालजीभाई  पटेल यांच्या स्मरणार्थ शाळेचे माजी विद्यार्थी महेशभाई पटेल यांच्याकडुन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पूरक आहार वाटप करण्यात आला.

शाळेवर प्रेम करणारे कै. रसिकलाल वालजीभाई पटेल यांनी शाळेला मोफत बोरचे पाणी दिले आहे. तसेच शाळेला वेळोवेळी शैक्षणिक साहित्य, पूरक आहार नेहमी देत असतात व शाळेला नेहमी सहकार्य करत असत तोच वारसा यांचे ज्येष्ठ चिरंजीव महेश भाई पटेल हे जोपासत आहे. अशा दातृत्वाचा अचानक निघून जाण्याने पटेल परिवारावर दुःख कोसळले आहे. त्या दुःखात महात्मा फुले हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार व संपूर्ण स्टॉप त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!