Home Cities यावल राजोरा जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

राजोरा जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
7


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुक्यातील राजोरा गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाचा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा उपक्रम यावेळी राबविण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक साहित्याच्या संचाचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाकडून कौतुकास्पद ठरला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न स्वीकारता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी, वैशाली पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता पाटील, शक्ती केंद्रप्रमुख मयूर महाजन, राजेंद्र महाजन, बापू कोळी, सोपान कोळी, हर्षल जावळे, प्रभाकर खंबायत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Protected Content

Play sound