Home Cities यावल आ.अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त यावलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

आ.अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त यावलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
20


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त यावल शहरात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा जल्लोष न करता समाजोपयोगी उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावल शहरातील श्री तारकेश्वर प्राथमिक विद्यामंदिर येथे या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अमोल जावळे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्यभर कार्य करणारे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचा वारसा आमदार अमोल जावळे पुढे नेत असल्याचे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले. हरिभाऊ जावळे यांचे विचार आजही कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात कायम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सदर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी यावलच्या नगरसेविका शुभांगी रोशन येवले, डॉ. युवराज चौधरी, किशोर कुलकर्णी, जितू कोळी, मुकेश कोळी, बबलू घारू, विजू कासार, वेंकटेश बारी, अतुल चौधरी, रोशन येवले, पिंटू फेगडे तसेच तारकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.


Protected Content

Play sound