काकडे गल्लीतून तरूणाची दुचाकी लांबविली

चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील काकडे गल्ली मधून तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता दरम्यान समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील मोरया नगर येथे निलेश लक्ष्मीकांत ढाके वय-२५ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता निलेश ढाके यांनी त्याची दुचाकी (एमएच १९ सीजी ३२०५) ही चाळीसगाव शहरातील काकडे गल्लीत पार्किंगला लावली होती. दरम्यान काम आटोपून परत आल्यानंतर रात्री ११.३० वाजता त्यांना त्यांच्या जागेवर दुचाकी मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही, अखेर त्यांनी सोमवारी ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content