ब्रेकिंग : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; ट्रकचालकाला अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । काकांचा मुलगा दवाखान्यात ॲडमीट असल्याने काकांसोबत जेवणाचा डबा घेवून येणाऱ्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरूणाच्या अंगावरुन ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मानराज पार्क येथे घडली. तर त्याचे काका नवल बिसन सपकाळे (वय ४७, रा. गाढोदा, ता.जळगाव) हे जखमी झाले आहे. अपघातानंतर ट्रकसह चालकाला अटक करण्यात आली. संजोग सुरेश सपकाळे (वय २०, रा. गाढोदा, ता. जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे संजोग सपकाळे हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याचे मोठे काका नवल सपकाळे यांच्या मुलाला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याच्या जेवणाचा डबा घेवून नवल सपकाळे आणि संजोद हे दुचाकीने जळगावला येण्यासाठी सोमवारी ४ मार्च रोजी निघाले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास खोटेनगरकडून शिवकॉलनीकडे जात असतांना नवल सपकाळे यांच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वार काका पुतणे हे रस्त्यावर कोसळून तो मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले. तर त्याचे काका यांना दुखापत झाल्याने ते जखमी झाले आहे. अपघातात दुचाकीस्वार तरुणाला ट्रकने चिरडल्यानंतर ट्रक चालक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच जिलहापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणाचा मृतदेह व जखमीला तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तसेच ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

अपघातात तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच मयत संजोग याच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. संजोग हा आयटीआयचे शिक्षण घेत असल्याने तो दररोज जळगावला येत होता. परंतु दुर्देवी काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. संजोग याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

Protected Content