आम्हाला राज्य सरकारवर विश्‍वास, नक्कीच न्याय मिळणार ! : एकनाथ खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कथित अवैध उत्खनन प्रकरणात आपल्यावर आकसापोटी एकतर्फी कारवाई करण्यात आली असून राज्य सरकारवर आमचा विश्‍वास आहे. त्यांच्या कडून आपल्याला नक्कीच न्याय मिळणारा विश्‍वास असल्याचे प्रतिपादन आमदार एकनाथराव खडसे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूज सोबत बोलतांना केले.

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मालकी असणार्‍या मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील जमीनीतून अवैध उत्खनन केल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणी नाथाभाऊंसह रक्षाताई, रोहिणीताई व मंदा खडसे यांच्यावर एकत्रीतपणे तब्बल १३७ कोटींचा दंड ठोठावण्याची शिफारस महसूल खात्याने नेमलेल्या एसआयटीने केली होती. यानुसार, दंठ ठोठावण्यात आला होता. तर याच प्रकरणात राज्य शासन त्यांच्या उतार्‍यांवर बोजे लावत असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली होती. यानंतर कालच राज्य शासनाच्या महसूल खात्याने एसआयटीचा अहवाल सदोष असल्याचे सांगत या कार्यवाहीला स्थ्गिती दिली.

दरम्यान, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने आज सकाळी आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी राज्य शासनाने आदेश जारी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, कथित अवैध उत्खनन प्रकरणात एकतर्फी कार्यवाही करण्यात आली. मुक्ताईनगरचे आमदार हे माझ्यावर नेहमी अनाठायी आरोप करतात. त्यांच्या तक्रारीवरून एसआयटीने चुकीची कार्यवाही केल्याबाबत मी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती. यावरून या कार्यवाहीला स्थगिती देण्यात आली असून आपण याचे स्वागत करतो.

याबाबत, आमदार एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, मला राज्य सरकारवर विश्‍वास आहे. या प्रकरणातील सत्य समोर येऊन आपल्याला नक्कीच न्याय मिळेल अशी आशा असल्याचे नाथाभाऊंनी याप्रसंगी नमूद केले.

Protected Content